"जि.प.प्रा.शाळा जगदंबानगर, कडदोरा" या शाळेच्या ब्लाॅगवर आपले सहर्ष स्वागत आहे!

Tuesday, 15 June 2021

नवीन विद्यार्थी प्रवेशोत्सव

 🌸 प्रवेशोत्सव 🌸



जि. प.प्रा.शाळा जगदंबानगर, कडदोरा येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन नवीन प्रवेश घेतले. शाळेचे स्वतंत्र संकेतस्थळ असून यावर मागेच गुगल फॉर्मद्वारे प्रवेश पात्र विद्यार्थी यांची माहिती घेतली होती.  यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्प, अध्ययन चार्ट देऊन केले.  विद्यार्थ्यांच्या पालकांकडून बालकांचे रितरसर फॉर्म भरून घेण्यात आले. कडदोरा गाव सध्या कोरोनामुक्त असल्याने विद्यार्थ्यांचे घरी जाऊन स्वागत केले. यावेळी बालकांना सॅनिटायझर केलेले साहित्य देऊन स्वागत केले. गतवर्षी कोरोना संकट असूनही ही शाळा विविध उपक्रमाद्वारे 365 दिवस सलग सुरू आहे. यात ऑनलाईन शिक्षणाबरोबरच ऑफलाईन शिक्षण ही सुरू आहे. याबरोबरच शाळेने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने मूल्यमापन करून सलग दोन वर्षे ऑनलाईन निकाल लावला आहे.




 तसेच पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांची ऑनलाईन बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा झाली. शााळेत सुरू असलेले विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच यावर्षी शाळेचे नियोजन सांगितले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नागेश चौधरी, बचत गट अध्यक्षा व शिक्षणप्रेमी सविता मुगळे, मुख्याध्यापक श्रीराम पुजारी, सहशिक्षक उमेश खोसे, गुलमल रणखांब, अंगणवाडी ताई कोमल पाटील, सुजाता रणखांब इत्यादी उपस्थित होते. यावर्षीही शाळा उन्हाळी सुट्टीतही नियमित ऑनलाईन सुरू होती. 




Friday, 30 April 2021

वार्षिक निकाल २०२०-२०२१

विद्यार्थी प्रगतीपत्रक सन २०२०-२०२१

जि.प.प्रा.शाळा जगदंबानगर कडदोरा         

                           ता.उमरगा जि.उस्मानाबाद


शाळेतील विद्यार्थ्याचा ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी सुरुवातीला वर्गाच्या समोरील CLICK HERE बटनाला क्लिक करा. त्यानंतर विद्यार्थ्याच्या नावावर क्लिक करा. समोर निकाल आलेला असेल. 



ऑनलाईन निकाल 

वर्ग 
निकाल 
पहिली 
Sankara College of Science And Commerce
दुसरी 
Sankara College of Science And Commerce
तिसरी 
Sankara College of Science And Commerce
चौथी 
Sankara College of Science And Commerce
पाचवी 
Sankara College of Science And Commerce



@ निकाल पाहताना खालील श्रेणी जरूर समजून घ्या.
 
अ - 1 श्रेणी  -     90 ते 100 गुण 
अ - 2 श्रेणी  -     80 ते 90 गुण 
ब - 1 श्रेणी  -     70 ते 80 गुण 
ब - 2 श्रेणी  -     60 ते 70 गुण 
क - 1 श्रेणी  -     50 ते 60 गुण 
क - 2 श्रेणी  -     40 ते 50 गुण 


धन्यवाद !! असेच भेट देत रहा.